Maharashtra Agriculture Department : कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द; २००९चा आकृतिबंध तात्पुरता कायम, फेरप्रस्तावाला मंजुरी

2009 Approved Structure to Remain Temporarily : २००९चा मंजूर आकृतिबंध तात्पुरता कायम राहणार असून, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे आणि शेतकरीकेंद्री योजनांचा आढावा घेऊन फेरप्रस्ताव तयार केला जाणार आहे.
Maharashtra Agriculture Department

Maharashtra Agriculture Department

esakal

Updated on

मुंबई : राज्याच्या कृषी विभागाचा सन २००९ च्या स्थितीनुसार मंजूर करण्यात आलेला सुधारित आकृतिबंध रद्द करण्यास व आकृतिबंधाबाबत फेरप्रस्ताव सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कृषी विभागांतर्गत कृषी आयुक्तालयाच्या क्षेत्रिय कार्यालयांसाठी २००९ च्या २७, ५०२ पदांच्या आकृतिबंधाच्या आधारे तयार नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधानुसार २३, ४३४ पदांच्या सुधारणेस मंत्रिमंडळाने यापूर्वी मंजुरी दिली होती.

या सुधारित आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी व विविध संघटनांनी आक्षेप घेतला. नवीन आकृतिबंधामुळे अनेक तालुक्यांतील कृषी विभागातील पदे कमी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी होणार आहेत. गेल्या महिन्यात १४ ऑगस्टला मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी तातडीने याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली होती.

Maharashtra Agriculture Department
Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

त्याचबरोबर, राज्यातील एल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि यात कृषी विभागावर असलेली क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी यांचा विचार करता हा कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने सादर केला.

Maharashtra Agriculture Department
Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

त्यामुळे विभागाचा २००९ चा मंजूर आकृतिबंध सध्या कायम राहणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विभागाचा सुधारित आकृतिबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार या फेरप्रस्तावात आता नव्याने कृषी विभागाकडील कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे, विविध संवर्गाच्या आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणासाठीच्या सुविधा, शेतकरी केंद्रीत योजनांचा कार्यभार तसेच भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com