maharashtra all party delegation
esakal
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आले. विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये राज ठाकरेंचा देखील समावेश आहे. त्यामुळे या भेटीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. महत्त्वाचे म्हणजे या भेटीदरम्यान निवडणूक अधिकारी यांना एक निवदेन देण्यात आलं असून याद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. हे निवेदन आता बाहेर आलं आहे.