चंद्रकांत पाटलांची 'भविष्यवाणी'; 'या' तारखेला होणार विधानसभा निवडणुका

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता.

- येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता.

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होईल आणि येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. तसेच महिनाभरात बऱ्याच काही घडामोडी घडतील. यामध्ये महायुतीच्या 250 जागा निवडून येतील, असेही ते म्हणाले.  

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी महिनाभरात बरीच उलथापालथ होईल आणि महायुतीच्या 250 जागा निवडून येतील. महाराष्ट्रात 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणूक होईल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणूक कधी जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे वक्तव्य केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Assembly Election Will Conduct Between 15th To 20th Of October Says Chandrakant Patil