Monsoon Session: विधीमंडळात दिवसभरात कुठल्या विषयांवर झाली चर्चा? जाणून घ्या एका क्लीकवर

mumbai
mumbaisakal

विधानसभेचं कामकाज उशीरापर्यंत सुरु

विधान सभेचं कामकाज रात्री ९.४८ पर्यंत सुरु होतं. आमदारांनी आपापल्या भागातील प्रश्न यावेळी अध्यक्षांसमोर मांडले.

विधानपरिषदेचं आजचं कामकाज समाप्त

विधान परिषदेचं आजचं कामकाज समाप्त झालं आहे. तत्पूर्वी उद्या सभागृहाचा कार्यक्रम काय असेल? याची माहिती सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्यानुसार, २५ जुलै २०२३ रोजी सकाळी 9.30 ते 11.45 या वेळेत सभागृहाची विशेष बैठक भरणार आहे. या बैठकीत प्रस्तावांवर चर्चा आणि त्यावर मंत्र्यांची उत्तर होतील. त्यानंतर २१ जुलैच्या ८ आणि एक प्रलंबित अशा ९ लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक दुपारी १२ वाजता भरेल, अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.

कोयता हल्लेखोरांवर आर्म अॅक्ट लावा - सुरेश धस 

राज्यात कोयता गँगचं प्रस्थ वाढत आहे. पण अशा हल्ल्यांमध्ये आर्म अॅक्ट लागू होत नाही. त्यामुळं यामध्ये गुन्हेगारांवर कडक शासन करणं शक्य होत नाही. त्यामुळं कोयता हल्लेखोरांवर आर्म अॅक्ट लागू करता यावं, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेत केली.

खासगी युट्यूब चॅनेलविरोधात मिटकरींनी आणला हक्कभंग 

सध्या खासगी युट्यूब चॅनेलचा खूपच सुळसुळाट झाला आहे. पत्रकारितेच्या नावाखाली आर्थिक लाभ होतोय म्हणून एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं आणि आर्थिक लाभापोटी त्याची प्रतिमा समाजात खराब करणं. याचे सातत्यानं अनुभव येत आहेत, असं सांगत याविरोधात आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.

रायगड विकास प्राधिकारणाची बैठक १५ ऑगस्टनंतर होणार?

रायगड विकास प्राधिकरणाची बैठक झाली पाहिजे. परंतू रायगडमधील आत्ताची परिस्थिती पाहिली तर सगळं प्रशासन पुनर्वसन आणि रिलिफमध्ये व्यस्त आहे. अशा वेळेला अधिवेशन आहे म्हणून त्यांना घाईघाईनं बोलावून घेणं मला योग्य वाटतं. त्यामुळं १५ ऑगस्टनंतर ही बैठक घ्यावी, अशी सूचना यावेळी सभापती निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली.

निधी वाटपावरुन विधानसभेत गोंधळ

निधी वाटपाच्या मुद्यांवरून विधानसभेत विरोधीपक्षाचे आमदार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. भाजपाचे आमदार राम कदम यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्हाला आमदार म्हणून काय न्याय दिला? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावर काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेतला आणि निधी वाटपावरून विधानसभेत गोंधळ झाला. सदस्यांनी पुरवणी मागण्यांवर बोलावं, चर्चा भटकवू नये अशी मागणी काँग्रेस आमदारांनी अध्यक्षांकडे केली.

सोशल मीडियावरील लिखाणाला कायद्याच्या चौकटीत बसवणार - फडणवीस

आयटी ॲक्ट खाली गुन्हा दखल केला तर शिक्षा कमी होते. जे वाटेल ते लिहितात आणि त्यानंतर डिलीट करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतात आणि वाचतात. या सगळ्या प्रकरणी एक कमिटी करण्यात येईल. कमिटी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लोकांना कशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत बसवता येईल, याचं काम करेल.

मिटकरींच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

अमोल मिटकरी यांनी जो विषय मांडला त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. एका ट्विटर हॅण्डलवरून जो अपमान सावित्रीबाई फुले यांचा करण्यात आला, हे कदापी मान्य होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी कलमे लावता येतात ती कलमे लावली आहेत. भारद्वाज स्पिक्स याने ते लिहिलं आहे. ती वेळा याची माहिती मिळवण्यासाठी ट्विटरला पत्र दिलं. परंतू त्यांनी या पत्राला उत्तर दिलं नाही. तरीदेखील त्याला आरोपी करून आम्ही कारवाई केली आहे.

सावित्रीबाई फुलेंच्या बदनामीकारक लिखाणावर मिटकरींचा प्रश्न

अमोल मिटकरींनी इंडिया टेल्स, हिंदू पोस्टकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त लिखानाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० हजाराची मदत जाहीर

अजित पवार : १९ ते २३ जुलै या काळात यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पिक आणि मालमत्ता नुकसान झालं आहे. २३ जुलै रोजी या भागाची पाहणी केली. तसेच तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांऐवजी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाच्या पार्श्वभूमिवर सरकारच्या उपाययोजनांची माहिती आजच देणार - अजित पवार

राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, तर पाच जिल्ह्यात पाऊस नाही. या पार्श्वभूमीवर सरकार करत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आज सभागृहाचं कामकाज संपायच्या आत निवेदन देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात दिली.

फोनवर बोलताना आढळलात तर...; उपसभापतींची आमदारांना तंबी

सभागृह चालू असताना, काही सदस्य हे कागद समोर ठेवून किंवा बाकात वाकून फोनवर बोलतात. सभागृहात फोनवर बोलायला बंदी आहे. मात्र तरीही अशी कृत्य होत आहे. यापुढे मला कोणी फोनवर बोलताना आढळल्यास मी फोन जप्त करणार अशी तंबी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आमदरांना दिली आहे

वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून निधी द्या; अनिल परबांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी

काल देवेंद्र फडणवीस व अजित पवार याचा वाढदिवस होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी वाढ दिवस साजरा केला नाही. मी संपूर्ण सभागृहाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दोघंही उपस्थित आहेत. आम्हा सर्वांना मात्र रिटर्न गिफ्ट म्हणून योग्य तो निधी द्यावा ही विनंती करतो. अशी अजब मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलाी

निधीवाटपावरून विरोधकांच्या आरोपांना देवेंद्र फडणीसांचं सडेतोड उत्तर

पावसाळी अधिवशनात विरोधकांकडून निधीवाटपावरून सत्ताधाऱ्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं, आमच्यासोबत राष्ट्रवादी आलीय पण जे लोकं आमच्यासोबत आले नाहीत त्यांना देखील निधी मिळाला आहे. सरसकट निधी दिला नाही असे नाही. हे मान्य करतो की आम्हाला २५ कोटी मिळाला असेल तर त्यांना एखाद्या ठिकाणी पाच-दहा कोटीच मिळाला असेल, असे फडणवीस म्हणाले. हे विधानसभेचं झालं. विधानपरिषदेबद्दल मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चा करून कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असा प्रयत्न केला जाईल असे फडणवीस म्हणाले.

रोहित पवारांचे आंदोलन अखेर मागे! उदय सामंतांनी काढली समजूत

कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा या ठिकाणी औद्योकीक्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. यासाठी शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित ओवर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली आंदोलन करत होते अखेर उदय सामंतांनी रोहित पवार यांची समजूत काढली आणि रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

रोहित पवारांनी 'तेथे' आंदोलन करू नये; विधानसभा अध्यक्षांचे आवाहन

सभागृहात यापूर्वीही ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडील पायऱ्यांवर आंदोलन केले तेव्हा एकमताने ठरले तिकडे त्याचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. त्यामुळे तेथे आंदोलन किंवा उपोषण करू नये असं आवाहन आम्ही रोहीत पवार यांना केले आहे. त्यांनी तेथे बसू नये. राष्ट्रवादी पक्ष आणि शासनाने त्यांची समजूत घालावी आणि त्यांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडवं असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

'खोक्यावर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला', विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक

पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्या विरोधात विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक होत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपरणे, टोपी घालून टाळ मृदुंगाच्या तालावर खोक्यावर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .

रोहित पवारांच विधानभवनातील छत्रपतींच्या मूर्तीजवळ आंदोलन

कर्जत जामखेड मध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे, या मुद्द्यांवरून आमदार रोहित पवार हे एकटेच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ आंदोलनाला बसले आहते.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा सहावा दिवस असून आज विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. आज, २४ जुलै रोजी दिवसभरात घडणाऱ्या विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व महत्वाच्या अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com