आमदारांनी रोज केले सरासरी चार तास काम

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

  • एकूण कामकाज झाले ७८ तास ४२ मिनीट
  • न झालेल्या कामकाजाचा कालावधी १३ तास ३९ मिनीटे
  • दररोज सरासरी झाले ३ तास ५५ मिनीटे कामकाज
  • एकूम २८ विधयके झाली सादर

मुंबई : विरोधकाविनाच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचे आज सुप वाजले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता. आज या आमदारांचे निलबंन मागे घेण्यात आले तरीही विरोधांचा बहिष्कार सुरूच होता. विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतलेल्या सर्वाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आभार मानले. या पुढचे पावसाळी अधिवेशन २९ जुलै २०१७ रोजी होणार असल्याचेही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहिर केले.

शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरून विधानसभेत अभूतपुर्व गोंधळ झाला होता. याकाळात विधानसभा काजकाज सुरळीत पार पडवे म्हणून अध्यक्षांनी गटनेतेच्या एकूण २० बैठक घेतल्या. विधानसभेचे एकूण कामकाज कालावधी ७८ तास ४२ मिनीटे तर होवू न शकलेले कामकाज कालावधी १३ तास ३९ मिनीटे आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्च २०१७ रोजी सुरू झाले होते. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सरासरी दररोज ३ तास ५५ मिनीटे कामकाज झाले.

विधीमंडळ कामकाज कार्यालयाकडे १० हजार ५५१ प्रश्नांपैकी ७२२ प्रश्न स्विकारण्यात आले. त्यापैकी ७७ प्रश्नाची तोंडी उत्तरे देण्यात आली. याकाळात विधानसभेत ५ अल्प सुचना सदस्यांनी सुचवल्या त्यापैकी १ सुचनेचा स्विकार करण्यात आला. विधानसभेत विचारण्यासाठी विधानभवन कार्य़ालयाकडे २७५२ लक्षवेधी सुचना आल्या होत्या. त्यापैकी ८८ लक्षवेधी पुकारण्यात आल्या. त्यापैकी ३३ लक्षवेधींवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. विधानसभेमध्ये २८ विधयके सादर करण्यात आली. यापैकी ११ विधेयके संमत करण्यासाठी विधान परिषदेत पाठवण्यात आली. विधानसभेच्या कामकाजाच्या काळात नियम २९३ अन्वये २ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. विधानसभेत सदस्यांची एकूण उपस्थिती ७६. ३३ टक्के होती. सदस्यांची कमाल उपस्थिती ८७. ४९ टक्के तर किमान उपस्थिती ५०. ५८ टक्के होती.

Web Title: Maharashtra assembly session ends amid boycott of opposition