esakal | मुंबई : आणखी एक संशयित दहशतवाद्याला अटक; महाराष्ट्र ATSची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

महाराष्ट्र एटीएसने बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून आणखी एकाला वांद्र्यातून अटक केली आहे.

मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला अटक; महाराष्ट्र ATSची कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

महाराष्ट्र एटीएसने बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून आणखी एकाला वांद्र्यातून अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या झाकीर शेख आणि रिझवान मोमीन यांचा ताबा एटीएसला मंगळवारी मिळाला. त्यानंतर आणखी संशयितांचा शोध महाराष्ट्र एटीएसने केला आहे. बुधवारी रात्री एटीएसने मोहम्मद इरफान रहमत अली शेख याला अटक केल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय 50 वर्षे) हा पेशाने लेडीज टेलर आहे. त्याला मुंबईच्या वांद्रे येथील खेरवाडी भागातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील नांदेड, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यातून 10 जणांना समन्स जावून चौकशीला बोलावले होते.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 डाॅक्टरांना कोरोनाची लागण

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जान मोहम्मद शेखच्या संपर्कात असलेल्या दोघांना महाराष्ट्र एटीएसने १८ आणि १९ सप्टेंबरला अटक केली होती. त्यानंतर दोघांचे कनेक्शन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याशी असल्याचं समोर आलं होतं. शस्त्रे पुरवण्याची जबाबदारी या दोघांकडे देण्यात येणार होती अशी माहिती मिळाली आहे. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर मंगळवारी दोघांनाही एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. तेव्हा दोघांची पुन्हा चौकशी केल्यानंतर आणखी काही जण एटीएसच्या रडारवर आले असल्याचं सांगण्यात येत आहे.

loading image
go to top