Aurangabad Crime: औरंगाबाद हादरलं! आईच्या सांगण्यावरूण पतीनं केली पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाची हत्या

औरंगाबाद शहर दुहेरी हत्याकांडाने हदरलं
Aurangabad Crime
Aurangabad Crime esakal
Updated on

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर दुहेरी हत्याकांडाने हदरलं आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने औरंगाबाद जिल्हात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Aurangabad Crime
Pune Crime: गुन्हेगारीचा पुणे पॅटर्न ! तुमचाही मुलगा कोयता गॅंगमध्ये नाही ना?

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के दांपत्य राहत होते. यामध्ये अडीच वर्षांचा मुलगा पत्नी आणि आरोपीची आई एकत्र राहत होते.

मात्र आरोपी पति आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद देखील झाले होते. दरम्यान काल रात्री या पति पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर समीर मस्के यांने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आणि मुलगा निशात यांची गळा आवळून हत्या केली.

Aurangabad Crime
Pune crime: पुण्यात चाललंय तरी काय! कोयता गॅंगसोबत, वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रीय

दरम्यान औरंगाबाद मधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याआला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्य म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com