Pune crime: पुण्यात चाललंय तरी काय! कोयता गॅंगसोबत, वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रीय

पुणे शहराला 'कोयता गँग' चे ग्रहण
Pune crime
Pune crimeesakal
Updated on

Pune crime: गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहराला 'कोयता गँग' चे ग्रहण लागले आहे. मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगर, टोळक्यांकडून अनेक वेळा कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सर्रास सुरू आहेत.

Pune crime
Shivsena News: शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; भाजपच्या या बड्या नेत्याची कबुली

दरम्यान कोयता गॅंगची दहशद मोडत नाही तो पर्यंतचं आता वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पुण्यात रात्री मध्यरात्री काही तरूण टोळकी तोंडाला मास्क लावून हातात दगड, दांडकी घेवून गाड्यांची तोडफोड करत आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोखले नगर भागात या टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केली.

Pune crime
Sanjay Raut : "संजय राऊत भांग पिऊन आमच्यासोबत फोटो काढला का?"

या तोडफोडीत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या तर दुचाकी गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फोडल्या. यामध्ये पाच ते सहा जणांच्या टोळक्यानी हातात शस्त्र घेऊन ही तोडफोड केली. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. मागील काळात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतरही पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com