

Maharashtra auto taxi Marathi rule
esakal
मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी न येणाऱ्या चालकांचे लायसन्स रद्द करण्याची तरतूद करणारा शासन निर्णय आज जाहीर होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मोटर वाहन कायदा १९८८ मध्ये बदल करून महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ आजपासून लागू होणार आहेत.