
Summary
सोयाबीनसाठी कमी भाव आल्यास शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या ऐवजी इतर उपाय करावेत असे कठोर वाक्य त्यांनी वापरले
त्यांनी डॉ. आंबेडकर आणि शरद जोशींचे उदाहरण पुढे करुन राजकीय-आर्थिक लढाईसाठी ऐक्यही सुचवले.
त्यांच्या विधानामुळे राज्यभर चर्चा-सुरु झाली आणि हा विषय राजकीय व सामाजिक वाद निर्माण करतो आहे.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना उद्देशून एक खळबळजनक विधान केले आहे, ज्याची चर्चा आता राज्यभर चांगलीच रंगली आहे. शेतकऱ्यांना काहीच येत नसल्यासारखे वाटते पण आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये केले. सरकार हे डुकरासारखे आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. अशी त्यांनी थेट सरकारवर टीका केली.