esakal | Lakhimpur: देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Lakhimpur: देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून - संजय राऊत

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करुन घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडल्या गेल्याने मृत्यू झाला. यावेळी झालेल्या हिंसाचारात एकूण ८ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसून येता आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या संदर्भात आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: "...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

शेतकऱ्यांच्या हत्या करून केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मोकाट : संजय राऊत

लखीमपूर खीरी मध्ये झालेल्या घटनेत शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, या घटनेचा निषेध करण्यासाठी ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणारं असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कायदा चिरडला जातो, गुन्हेगारांना मोकाट सोडलं जातं हे सर्व देशातील जनतेनं पाहिलं त्यामुळे या बंदमध्ये लोक स्वत: सहभागी होतील असं राऊत यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचे खुन करुन केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मोकाट फिरत असल्याचा गंभीर आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा: Chipi Airport: आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री - नारायण राणे

भाजप हा शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष: नवाब मलिक

भाजपने शेतकऱ्यांची लुट करण्यासाठी कायदे केले. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार नाही. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने ताफ्याने शेतकऱ्यांना चिरडलं. तसेच त्या प्रकरणातील आरोपी पळून गेला, लखीमपूर सारखी घटना घडल्यानंतर भाजपनेते त्यांना भेटायला जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजप हा शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी केला. उत्तर प्रदेशच्या जुलमी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी हा बंद असल्याचं यावेळी नवाब मलिक यांनी सांगितलं.

तसेच ११ ऑक्टोबरला होणाऱ्या बंदला रात्री १२ पासून बंदला सुरूवात होणार असून त्यात अत्यावश्यक सेवांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना केलं.

loading image
go to top