

Summary
1️⃣ राज्य सरकारने बांग्लादेशी घुसखोरांवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन आदेश जारी केला आहे.
2️⃣ शिधापत्रिकांची पडताळणी करून घुसखोरांची नावे वगळण्याचे निर्देश दिले आहेत.
3️⃣ एटीएसकडून मिळालेल्या यादीतील नावांवर जारी झालेल्या अधिकृत कागदपत्रांची चौकशी होणार आहे.
राज्य सरकारने बांग्लादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या घुसखोरांची काळी यादी तसेच शिधापत्रिका पडताळणी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. यासोबतच नवीन शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.याबाबत शासनिर्णय जारी करण्यात आला आहे.सरकारने उचललेल्या या पावलामुळे बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार आहे.तसेच उपाययोजनाचा अहवाल ATS कडे पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.