मुंबई - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथीच्या रोगांमध्ये वेगाने वाढ होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभरात इन्फ्लुएंझा आजाराचे (फ्लू) ६६३ रुग्ण आढळले आहेत..यापैकी १४० रुग्ण हे मागील दीड महिन्यांत आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यांमध्ये नागपूरमधील दोन आणि नाशिकमधील एका रुग्णाचा समावेश आहे.राज्यात जुलै महिन्यात ४८, तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातच विविध आजारांचे ३३ उद्रेक नोंदवले गेले आहेत. विशेषतः गडचिरोली, धुळे, पालघर, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांत वारंवार उद्रेक होत असून स्वच्छता सुधारणा, सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे, स्वच्छतेचा अभाव यामुळे हे उद्रेक होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे..शहरी भागफ्ल्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीयविशेषतः मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत फ्लूचे रुग्ण अधिकवेळेवर उपचारांमुळे गंभीर परिणाम टळत असले तरी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी.मुंबई व उपनगरेसाचलेले पाणी व अस्वच्छतेमुळे लेप्टोस्पायरोसिसची रुग्णसंख्या मोठीजुलै महिन्यात १४४, तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ८२ रुग्णांची नोंदआजारामुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.ग्रामीण भागअकोल्यात पटकीचे २५ रुग्ण नोंदविले. एकाचा मृत्यूअमरावती, पालघर जिल्ह्यांत गंभीर जुलाबामुळे ५२ रुग्ण बाधित. दोन रुग्णांचा अंतडायरियाचे (अतिसार) ६५९ रुग्णकावीळचे ६१० रुग्ण, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत तीन मृत्यूछत्रपती संभाजीनगरात टायफॉईडचे आठ रुग्ण, नागपूर व गोंदियात मिळून चार रुग्ण.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.