esakal | संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावली, आतातरी थांबा : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे निकाल लागले. महायुतीला जनादेश दिला होता. परंतू, या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. अडीच वर्षांचे पहिल्या दिवसापासून सुरु केले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. पण, त्यांना भाजपला भेटायला वेळ नव्हता. शेवटी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे.

संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावली, आतातरी थांबा : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संजय राऊत यांनी आतातरी बोलणे बंद करावे. शिवसेनेची वाट लावली. संजय राऊत यांच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. पाठीत खंजीर खुपसण्याची भाषाण त्यांना शोभत नाही. उद्धव ठाकरेंनी आता त्यांना आवरावे. आम्ही मातोश्रीवर जात होतो. मात्र, त्यांना सिल्व्हर ओकवर किंवा हॉटेलवर जावे लागले, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

चंद्रकांत पाटील म्हणाले, की 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे निकाल लागले. महायुतीला जनादेश दिला होता. परंतू, या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. अडीच वर्षांचे पहिल्या दिवसापासून सुरु केले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. पण, त्यांना भाजपला भेटायला वेळ नव्हता. शेवटी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, सावरकरांना भारतरत्न देण्याची भूमिका सोडली, तसेच त्यांनी शिव नाव सोडले. सर्वांत जास्त जागा मिळाल्याने आम्हीच सरकार स्थापन करावे, असे सगळ्यांचे मत होते. 

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस