Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

maharashtra board 12th result date out 28 may
maharashtra board 12th result date out 28 may

पुणेः महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा (HSC) निकाल मंगळवारी (ता. 28) दुपारी एक वाजता जाहीर होणार असून, mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यापैकी 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी व 6 लाख 48 हजार 151 विद्यार्थीनी आहेत. राज्यातील 9 हजार 771 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक 5 लाख 69 हजार 446 विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून 4 लाख 82 हजार 372 तर वाणिज्य शाखेतील 3 लाख 81 हजार 446 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 58 हजार 12 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक 3 लाख 35 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर सर्वात कमी 32 हजार 362 विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.

नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

येथे पाहा निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.

असा पाहा निकाल –

  • वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
  • संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • आसनक्रमांक टाका
  • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  • निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com