Maharashtra Budget 2019 : महिला स्वयंरोजगारासाठी २०० कोटींची योजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

विधवा, परित्यक्‍ता आणि घटस्फोटित महिलांना आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी स्वयंरोजगार योजना तयार करण्यासाठी २०० कोटी रुपयांची नवीन योजना तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मात्र, या योजनेचे स्वरूप अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मुंबई - विधवा, परित्यक्‍ता आणि घटस्फोटित महिलांना आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी स्वयंरोजगार योजना तयार करण्यासाठी २०० कोटी रुपयांची नवीन योजना तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मात्र, या योजनेचे स्वरूप अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकरिता या अर्थसंकल्पात १२ हजार ३०३ कोटी ९४ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन दिव्यांगत्वाच्या प्रमाणानुसार वाढ करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना ६०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्यात आली आहे. या योजनेत विधवा लाभार्थ्यांना एक अपत्य असल्यास प्रतिमहिना ११०० रुपये व २ अपत्ये असल्यास रुपये १२०० इतके अर्थसाहाय्य केले जाणार आहे. यासाठी सुमारे १ हजार ५०० कोटी इतका आर्थिक भार वाढणार आहे.  

महिला व बालविकास विभाग व आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आणि इतर प्रवेशितांसाठी परिपोषण आहारासाठी ९०० रुपयांवरून १५०० रुपये करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Budget 2019 Women Self Employment Scheme