Maharashtra Budget: अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा पहिलाच अर्थसंकल्प; जनतेतून मागवल्या सूचना

अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal

केंद्रीय अर्थसंकल्प काल देशासमोर मांडण्यात आला. आता थोड्याच दिवसांमध्ये राज्याचा अर्थसंकल्पही मांडण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अर्थमंत्री म्हणून हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यासाठी आता जनतेमधून संकल्पना मागवण्यात आल्या आहेत.

अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. २७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. लवकरच कामकाज सल्लागार समितीमध्ये अर्थसंकल्पाचं वेळापत्रक ठरणार आहे. या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे.

हेही वाचा - पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

आत्तापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षेते अशी विविध पदं भूषवली आहेत. मात्र अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. आमदार असताना त्यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच अर्थसंकल्प या विषयावर अनेक व्याख्यानेही दिली आहेत. या अर्थसंकल्पात लोकांच्या सूचनांचं प्रतिबिंब असावं, म्हणून जनतेतून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

संकेतस्थळावर जाऊन लोकांना आपल्या सूचना मांडण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com