Maharashtra Budget Session: एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना सभागृहात डिवचलं; म्हणाले,...

पटोले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना सभागृहाताच डिवचलं
Maharashtra Budget Session 2nd day
Maharashtra Budget Session 2nd day

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यााच प्रयत्न केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना त्यांना सभागृहातच डिवचलं.(Maharashtra Budget Session 2nd day price for onion Cm Eknath Shinde Nana Patole )

शेतकऱ्यांवर पोलीस लाठीचार्ज करतात, राज्य हुकुमशाहीकडे चाललं आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आणि सभात्याग असेही पटोलेंनी यावेळी सांगितले. मात्र, सभागृहातून कोणीच उठले नाही. यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोलेंना डिवचलं आहे.

Shivsena : संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला मिळताच ठाकरे पिता पुत्रांचे हटवले फोटो

सभागृहात नेमकं काय घडलं?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुलढाण्यात शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा मुद्दा उपस्थित केला. रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. सोयाबीन, कापसाला भाव मिळावा म्हणून ते आंदोलन होतं.

Thackeray vs Shinde: याच आठवड्यात संत्तासंघर्षाचा फैसला; घटनापीठाकडून जाहीर

पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना त्रास दिला. याची चौकशी करा आणि पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी पवारांनी केली.

नाना पटोले यांनी नाफेड खरेदीसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. अमरावतीमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीमाराचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांवर पोलीस लाठीचार्ज करतात, राज्य हुकुमशाहीकडे चाललं आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. अंगणवाडी सेविकांचा मुद्दाही अजित पवार, नाना पटोले यांनी उपस्थित केला.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "अंगणवाडी सेविकांबद्दल अजित पवार बोलले होते. विरोधी पक्षनेता तुमचा एकच आहे की वेगळा आहे? नाना, अशी परिस्थिती आलेली आहे की, तुम्ही सांगितलं की सभात्याग करा तरी कुणी केला नाही.

अशोकराव, नाना तुमचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले सभात्याग करा, तर तुम्ही उठलेच नाही. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. नानाभाऊ सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कुणी केलंय, राज्याला माहिती आहे.

बारा हजार कोटी रुपये या सरकारने दिले. हे सरकार संवेदनशील आहे म्हणून एनडीआरएफच्या नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही पैसे दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com