
Sakal
Summary
राज्यातील नागरिकांना कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित.
१८ रुग्णालयांमधून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार.
महाकेअर फाऊंडेशन (MAHACARE Foundation) स्थापन; १०० कोटींचा निधी मंजूर.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग , ऊर्जा, नियोजन विभागाबाबत आज ५ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित करण्यात आले असून नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.