राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचे वातावरण?

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

सध्याच्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला २४ खाती येण्याची शक्‍यता आहे. परिणामी शिवसेनेकडे जादा खाती गेल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अवस्थतेचे वातावरण आहे.

खातेवाटपात शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह सर्वात जास्त खाती गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून यातील काही खाती परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याच्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला २४ खाती येण्याची शक्‍यता आहे. परिणामी शिवसेनेकडे जादा खाती गेल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अवस्थतेचे वातावरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या खातेवाटपात शिवसेनेकडे गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, एमएसआरडीसी, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, उद्योग व खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन, मराठी भाषा - सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास, सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय खाते आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ  आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न व नागरी पुरवठा, कामगार, अल्पसंख्याक विकास, ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, अन्न व औषध प्रशासन ही खाती आहेत.

खातेवाटपाची कोंडी सुटेना; काँग्रेस म्हणते, 'शब्द पाळला गेला नाही...'

काँग्रेस पक्षाकडे महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन - दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, ओबीसी मंत्रालय आहे. आता या खातेवाटपातील शिवसेनेकडील गृह विभाग राष्ट्रवादीकडे, तर राष्ट्रवादीकडील ग्रामविकास विभाग शिवसेनेकडे गेला आहे. त्यामुळे खाते वाटपावर चर्चा होत आहे. या गोंधळामुळे खातेवाटप लांबण्याची चिन्हे आहेत.

खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही. काही प्रस्तावांवर मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा आहे. यावर त्यांच्यासमवेत आज (ता. ३) चर्चा होईल आणि त्यानंतर ते निर्णय जाहीर करतील.
- बाळासाहेब थोरात, मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra-cabinet-expansion attempts to get additional department from Shiv Sena