शपथ घेण्याआधी काय म्हणतायत 'जितेंद्र आव्हाड' ?

सकाळ वृत्तसेवा, मुंबई
Monday, 30 December 2019

आज महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होतोय. यामध्ये ठाण्याचे आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड हे देखील शपथ घेणार आहेत.  जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतात.  

राष्ट्रवादी काँग्रेसमधले फायरब्रँड नेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख जातात. पक्षातला ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. आघाडीच्या काळातही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि फलोत्पादन मंत्री राहिलेत.  

मोठी बातमी :  हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाबाबत पोलिसांनी घेतला हा निर्णय...

आपल्या वकृत्त्वाच्या जोरावर ते पक्षाची भूमिका ठामपणे मांडतात. सध्याच्या काळात शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. महाविकास आघाडीच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावरच होती. शिवाय आमदारांना कर्तव्यदक्षतेची शपथ देण्याची संकल्पानाही आव्हाडांनीच राबवली.

मोठी बातमी : शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात गावपाड्यातील आमदारांना दिली संधी.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी माध्यमांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना गोर गरीब जनतेसाठी काम करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसंच आज होणारा शपथविधी माझी मुलगी पाहणार असल्याने मला आनंद होतोय असं आव्हाड म्हणालेत.  

काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड, पाहा व्हिडीओ : 

WebTitle : maharashtra cabinet expansion jitendra awhad before taking oath as minister

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cabinet expansion jitendra awhad before taking oath as minister