

Mahayuti cabinet Meeting decisions
ESakal
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने राज्याच्या शहरी विकास, गृहनिर्माण, पुनर्वसन, कौशल्य विकास आणि कायदेशीर सुधारणांना गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या धोरणांमुळे जमिनीचा वापर, घरांची उपलब्धता, पुनर्वसन प्रक्रिया, कौशल्य शिक्षण आणि कायदेशीर सुधारणांमध्ये व्यापक सुधारणा घडून येतील अशी अपेक्षा आहे.