professor recruitment
sakal
मुंबई - प्राध्यापक भरतीसाठी संबंधित विषयांसाठी कोणत्याही विद्यापीठ, शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक अर्हता, पदवी आदी समानस्तरावर गणली जाते. यात कोणताही भेदभाव अथवा कमी गुणांकन म्हणून लेखले जात नाही.
असे सूत्र देशभरात लागू असताना राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपल्याच राज्यात होणाऱ्या प्राध्यापक भरतीसाठी आपल्या राज्यातील उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेसोबत पदवीलाही कमी गुण देत आपल्या उमेदवारांप्रती दुजाभाव करण्याचा प्रताप केला आहे.