चुकली रे भेट,  ऐसी ताटातूट!

सिद्धेश्वर डुकरे
सोमवार, 23 जुलै 2018

संत्रानगरीतील पावसाळी अधिवेशन ताजताजं संपवून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मुंबईला परतले अन्‌ लगेचच एक दिवस संपतो न संपतो तोच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बैठकांचे सत्र सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे देवेनभाऊंचे मित्र आणि पक्षाचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षातील मान्यंवर आदींनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. या शुभेच्छा स्वीकारत असताना उद्या (ता. २३) पंढरपुरी आषाढी वारीला सपत्नीक शासकीय महापूजेला जाण्याच्या आठवणीने देवेनभाऊ सात्त्विक सुखावले. 

आज आपला वाढदिवस आहे. त्यातच अमितभाई शहा यांच्या थेट भेट शुभेच्छा आणि उद्या विठ्ठल-रखूमाई पूजा सोहळा. ही सबंध चित्रसंगती नजरेसमोर उभी राहिल्यावर देवेन भाऊंना ‘लागली आस’ अशी तन्मयी उत्कटता दाटून आली. मात्र त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारीला पंढरपुरी न जाण्याचा कटू निर्णय देवेनभाऊंनी जाहीर केला आणि दादर येथील भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयातूनच पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाला साष्टांग दंडवत घालत साकडे घातले.

चुकली रे भेट । तुझी माझी ताटातुट । 
मज करूणा अवीट । आता सांगू कुणाला ।
माझ्या पंढरीच्या राया । आसुसलो नमन कराया । 
तुझे चरण धराया । लागली आस मला । 
मागणी मराठा आरक्षण । अडथळा ठरे प्रदक्षिण । 
प्रसंग आकस्मिक निर्माण । अवतरला कैचा । 
वाट कठीण बिकट । विविध मोर्चाची संकटं । 
मी सोडवीन सरसकट । लाभु दे साथ तुझी ।
वर्षे सरली चार । तरीही नित्यदिन घोर । 
संकटे येती अपार । विघ्नं शमव रे राणा ।
महत्त्वाच हे साल । कर कष्टाच मोल । 
पदरी २०१९ घाल । देवा आळवणी तुला ।
खुर्ची राहु दे घट्ट । नको कसलेच सावट । 
राहो अबाधित वीट । ध्यान ठेव रे वैष्णवा ।

Web Title: Maharashtra CM Devendra Fadnavis