CM Devendra Fadnavis : हे व्यवस्थेचं अपयश, अशा निवडणुका बघितल्या नाही! निकाल पुढे ढकलल्यानं मुख्यमंत्र्यांची नाराजी; आयोगाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे...

CM Fadnavis Slams Election Commission : नागपूर खंडपीठाच्या निर्णयाबाबत आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis

esakal

Updated on

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आज सुरु असलेल्या मतदानाचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हे मुळात व्यवस्थेचं अपयश आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com