Ladki Bahin Yojana : प्रत्येक गोष्टीत 'लाडकी बहीण' आणू नका,नाहीतर घरी बसावं लागेल... मुख्यमंत्री फडणवीस आपल्याच आमदारावर संतापले

Devendra Fadnavis : आमदार पवार यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना अवैध दारू विक्रीमुळे त्रास होत असल्याचा दावा केला. फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे आणि तिचे पैसे सुरूच राहतील असे स्पष्ट केले.
CM Devendra Fadnavis reacting sharply to MLA Abhimanyu Pawar in the Nagpur Winter Session over repeated references to the Ladki Bahin scheme.

CM Devendra Fadnavis reacting sharply to MLA Abhimanyu Pawar in the Nagpur Winter Session over repeated references to the Ladki Bahin scheme.

esakal

Updated on

Summary

  1. विधानसभेत अवैध दारू विक्रीचा मुद्दा मांडताना आमदार अभिमन्यू पवार यांनी पुन्हा “लाडकी बहीण”चा उल्लेख केला.

  2. काही मिनिटांपूर्वीच विरोधकांना हा उल्लेख टाळा असे सांगितलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर संताप व्यक्त केला.

  3. फडणवीस म्हणाले की “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, नाहीतर घरी बसावे लागेल.”

देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका नाही तर घरी बसावे लागेल अशी समज भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना दिली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहेत.या दरम्यान आमदार पवार यांनी अवैध दारु विक्रीच्या त्रास राज्यातील लाडक्या बहि‍णींना होत असल्याचे सभागृहात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच मिनिंटांपूर्वीच विरोधकांना प्रत्येक गोष्टीशी लाडक्या बहि‍णींना जोडू नका असं सांगितलं होतं पण तरीही स्वपक्षाचे आमदाराने लाडकी बहिणीचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री संतप्त झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com