सरकार आपलंच, कोणी नाराज होऊ नका; फडणवीसांचे आमदारांना आवाहन

devendra fadanvis
devendra fadanvisdevendra fadanvis

मुंबई : काल शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचे नवीन सरकार कामाला लागले आहे, यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप आमदारांची बैठक घेतली, या बैठकीत फडणवीसांनी आमदारांना हे सरकार आपलंच असून कोणी नाराज होऊ नका असे अवाहन केले. तसेच त्यांनी २०२४ निवडणूकीच्या तयारीला लागा असे निर्देशही दिले आहेत.

भाजपचा कार्यकर्ता नाराज झाल्याच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांना कार्यकर्त्यांशी संवाध साधत सरकार आपल्या हक्काचं आलं आहे, कोणीही नाराज होऊ नका, खचून जाऊ नका असं अवाहन केलं आहे. निधी वाटप व्यवस्थित होईल, पण जनतेत जाऊन काम करणं बंद करू नका, असे फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आपल्याला जनतेचं काम करायचं आहे, २०२४ च्या तयारीला लागा. अडीच वर्षात सर्व रखडलेली कामं मार्गी लावायची आहेत, त्यामुळं कोणी नाराज होऊ नका असे फडणवीस म्हणाले आहेत.

devendra fadanvis
दुसर्‍यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार; दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

काल झालेल्या शपथविधीनंतर आज सगळे आमदार हॉटेलवर आले होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी सर्वांची अपेक्षा असताना , त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने काही आमदार आणि भाजप कार्यकर्ते नाराज होते. यावर बोलताना कोणीही नाराज होऊ नका, रखडलेली कामे मार्गी लावू, जर कोणाची कामे रखडत असतील तर मला सांगा, हे आपलं सरकार आहे त्यामुळं कोणी काळजी करू नका. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद का स्विकारलं याचं कारण देखील फडणवीसांनी आमदारांना यावेळी सांगितलं.

devendra fadanvis
शिंदेच्या आग्रहानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री - चंद्रकात पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com