
Maharashtra CM Oath ceremony marathi news : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही मात्र शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे. तसंच एकूण तब्बल ४० हजार निमंत्रितांची उपस्थिती असेल असं सांगण्यात येत आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.