esakal | केंद्राकडून महाराष्ट्राला इतक्या कोटी लशींचा पुरवठा

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

केंद्राकडून महाराष्ट्राला इतक्या कोटी लशींचा पुरवठा

sakal_logo
By
टीम इसकाळ

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्या दिल्या. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांना त्यांनी अभिवादन केलं. उद्यापासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरु करण्यात येईल. केंद्राने तीन लाख लसी आज दिल्या आहेत. काल एकाच दिवशी पाच लाख लसींचे डोस देण्यात आहेत. येत्या काळात 18 लाख लस देण्यात येण्याचे आश्वासन केंद्राकडून देण्यात आले आहे, पण याची तारीख मिळालेली नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा: १२ कोटी डोस एकरकमी चेकने विकत घेण्याची तयारी आहे- उद्धव ठाकरे

केंद्राने दिलेली जबाबदारी आपण स्वीकारली आहे. लसीकरण उद्यापासून सुरु केले जाईल, पण केंद्रावर नागरिकांनी शिस्त दाखवावी. गोंधळ घालू नये. उपलब्धता असेल तसंतसं लसीकरण करण्यात येईल. जून-जूलेपर्यंत लशींचा पुरवठा सुरळीत होईल. गोंधळ, गडबड करु नका, घाई करु नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. जास्तीत जास्त लसींचा पुरवठा केंद्राने केल्यास महाराष्ट्र कोरोनावर नक्की मात करेल, असंही ते म्हणाले.

गेल्यावर्षीपासून देशावर संकट आलं आहे. हे दिवसही निघून जातील. कोरोनाचे निर्बंध लादण्यास मलाही आवडत नाही. पण, महाराष्ट्राच्या जनतेनं संयम दाखवला, आता आकडेवारी स्थिरतेकडे जात आहे. तरी निर्बंध लागू ठेवावे लागणार आहेत. रोजी मंदावेल, पण रोटी थांबणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.सध्या राज्यात साडेपाच हजार कोविड केंद्र आहेत. सुरुवातीला 2 प्रयोगशाला होत्या, त्या आता 609 झाल्या आहेत. राज्याची 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन क्षमता आहे, गरज 1700 मेट्रिक टनची आहे. इतर राज्यांकडून आपण ऑक्सिजन मिळवत आहोत, असं उद्धव ठाकरेनी सांगितलं.

हेही वाचा: राज्यात तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करा - मुख्यमंत्री

ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागतोय, पण तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही. काही दिवसांत 275 ऑक्सिजन प्लांट उभारले जातील. डब्ल्युएचओ आणि तज्ज्ञांचा सल्लाय की रेमडेसिव्हीर विनाकारण घेऊ नये. त्यामुळे रेमडेसिव्हीर आवश्यकता असल्यासच ते घ्या, जास्तीचा वापर धोक्याचा ठरु शकतो. पण, रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत होत आहे. आतापर्यंत 1 कोटी 58 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलंय. 7 कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जातोय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये.