

Summary
राज्यात थंडीने जोरदार प्रवेश केला असून तापमानात मोठी घसरण झाली आहे.
जळगावमध्ये तापमान १० अंश सेल्सियसवर आले — महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो आहे.
राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्याने हुडहुडी वाढली आहे.सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे.पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर भारतात गारठा वाढल्याने राज्यातही त्याचा परिणाम होत आहे, दरम्यान जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे.