Maharashtra Cold Wave : राज्यात पारा घसरला, तापमान ६ अंशावर; पुढील दोन दिवसांत हवामानात होणार मोठा बदल

Maharashtra Weather : हवामान विभागाने थंडीबाबत येलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, मालेगावसह विदर्भ–मराठवाड्यात कडाक्याची थंडी आहे. मुंबई–कोकणातही तापमान घटले असून सांताक्रूझ १७.२°C, कुलाबा २०°C नोंदले गेले.
Cold wave grips Maharashtra as temperatures plunge to 6°C in parts of North Maharashtra and Marathwada, with IMD issuing a yellow alert.

Cold wave grips Maharashtra as temperatures plunge to 6°C in parts of North Maharashtra and Marathwada, with IMD issuing a yellow alert.

esakal

Updated on

Summary

  1. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट निर्माण झाली आहे.

  2. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

  3. धुळे आणि सोलापूर (जेऊर) येथे राज्यातील किमान तापमान ६°C नोंदले गेले.

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसांत हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज आहे. थंडीची लाट कमी होणार असून मात्र गारठा कायम राहणार आहे. आज (ता. १५) राज्यात थंडीची लाट कमी होण्याचे संकेत आहेत.कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com