

Summary
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे.
धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमान ८.६°C नोंदले गेले.
जेऊर (करमाळा तालुका) येथे १०°C तापमानाची नोंद; दोन्हीकडे तीव्र थंडी.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी वाढली असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वाधिक कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर करमाळा तालुक्यातील जेऊर येथे १० अंश तापमानाचा नोंद झाली. या दोन्ही ठिकाणी थंडीची लाट आहे. याशिवाय जळगाव, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, निफाड येथील गहु संशोधन केंद्रात पारा ११ अंशापेक्षा कमी आहे.