

Maharashtra on Yellow Alert as Cold Wave Intensifies
Esakal
पुणे, ता. १६ : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरूच असल्याने राज्यातील थंडी वाढली आहे. पहाटे धुक्याची दुलई पांघरली जात असून दव पडत आहे. उद्या (ता. १७) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.