

Maharashtra Cold Wave : IMD ने काही जिल्ह्यांसाठी थंडीचा यलो अलर्ट जारी केला.
esakal
IMD Weather Update Maharashtra : हिवाळ्यामध्ये यंदा तापमानातील सर्वाधिक घसरण राज्यात पहायला मिळत आहे. धुळे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील अन्य भागात थंडीची लाट आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच ११ अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेला. तर पुण्यात ७.९ अशांवर पारा पोहोचला आहे. मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान थंडी आणखी वाढलेली पहायला मिळाली. त्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच जाणवला. दिवसभर तापमान अत्यंत थंड राहत आहे. मध्यरात्रीनंतर मात्र रिक्षाचालक, सुरक्षा रक्षक यांना शेकोटीचाच आधार घ्यावा लागला.