Sunil Keadar: सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा; 10 लाखांचा दंड!

कोर्टाच्या या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Sunil Kedar
Sunil Kedar

नागपूर : काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. (Maharashtra Congress leader Sunil Kedar sentenced to five years fine of rs 10 lakhs)

Sunil Kedar
Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे आले एकत्र; CM एकनाथ शिंदेंचं वाढणार टेन्शन?

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनील केदार यांना ही शिक्षा सुनावली आहे. ३१ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. सकाळी कोर्टात सुनावणी झाली तेव्हा सुनील केदार यांच्यावर दोष निश्चिती झाली होती. यामध्ये एकूण ९ आरोपी होते त्यांपैकी ६ आरोपींना दोषी तर ३ आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं होतं.

आता त्यांना पाच वर्षांसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून हा दंड न भरल्यास एक अतिरिक्त एक वर्षांची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. कारण येत्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com