

मुंबई: सततच्या इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या वतीने मंगळवारी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी आणि जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.