राज्यात कोरोनाचा विळखा सैल; दिवसभरात ६५६ नव्या रुग्णांची भर | Maharashtra corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

राज्यात कोरोनाचा विळखा सैल; दिवसभरात ६५६ नव्या रुग्णांची भर

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात कोरोनाचे 8 रुग्ण दगावले (corona deaths) असून कोरोना काळातील नीचांकी नोंद झाली. आज रुग्णसंख्या ही नियंत्रणात आली असून 656 नवे रुग्ण सापडले (corona new patients) .तर आज 768 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,76,450 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 % एवढे झाले आहे.

हेही वाचा: RTI : कोविड फंडातून केवळ 25 टक्के रक्कमेचे वाटप; वाचा सविस्तर माहिती

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,747 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 9678 इतकी आहे.आज 656 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,30,531 झाली आहे.    

नाशिक ,कोल्हापूर औरंगाबाद,लातूर , अकोला,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 4,पुणे 4 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 96,042 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1033 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top