esakal | Corona Update: राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के; 7,302 नवे कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के; 7,302 नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : महाराष्ट्र राज्यात आज 7,302 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यात 94,168 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 60,16,506 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 1,31,038 वर पोहोचला आहे. राज्यात रुग्ण दगावण्याची संख्या आज 120 पर्यंत खाली आली. बुधवारी 165 मृत्यू झाले होते. मृतांचा एकूण आकडा 1,31,038 वर पोहोचला आहे. कोल्हापुरात मृत्यूचे आज सर्वाधिक 45 मृत्यू कोल्हापूर मंडळात नोंदवण्यात आले. तर ठाणे 35, पुणे 17, औरंगाबाद 8, नाशिक 8, नागपूर 4 आणि लातूर मंडळ 3 मृत्यू नोंदवले गेले. अकोला मंडळात शून्य मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर 2.09 % इतका आहे.

हेही वाचा: 'ज्या प्रॉपर्टीवर योगी बसलेत, ती जनता जप्त करु शकते'; प्रियांकांचा हल्लाबोल

राज्यात आज दिवसभरात 7,302 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,45,057 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94,168 इतकी आहे. आज दिवसभरात 7,756 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,16,506 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.34 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,62,64,059 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,45,057 (13.5 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,872 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image