esakal | Corona Update: राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

Corona Update: राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्क्यांवर

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे. तर सहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, यामुळं कोरोनाचा रिकव्हरी रेट ९६.१७ वर पोहोचला आहे. (Maharashtra Corona Update recovery rate increased aau85)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ८,६०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर ६,०६७ रुग्ण बरे झाले आहेत. आजवर ५९,४४,८०१ रुग्ण आजवर बरे झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात एकूण १,०६,७६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.१७ टक्के झालं आहे.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी

मुंबईत शहरात गेल्या चोवीस तासात ६३५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८२ रुग्ण बरे झाले आहेत. आजवर ७,०४,२५९ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, शहराचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात ६,९८९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपट्टीचा दर हा ९२८ इतका आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

loading image