esakal | १८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी स्लॉट? आरोग्यमंत्री म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ठरावीक केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे.

१८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी स्लॉट? आरोग्यमंत्री म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यभरात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला सुरवात करण्यात आली. उपलब्ध लसींच्या बळावर ३ लाख जणांना लसीकरण करण्यात आले. पण सध्या राज्यभरात सर्वत्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. लसीकरणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे राज्य सरकार १८ ते ४४ मध्ये स्लॉट पाडण्याचा विचार करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ()

हेही वाचा: पूर्ण लॉकडाउनचा विचार करा; राज्य सरकारला हायकोर्टाच्या सूचना

टेक्नोसॅव्ही लोक घेतायत फायदा

टोपे म्हणाले, लसीकरण केंद्रावर त्याच भागातले लोक न जाता शहरी भागातील लोकांनी लसीकरण केल्याच्या घटना घडत आहेत. टेक्नोसॅव्ही लोक ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर जाऊन याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटात स्लॉट पाडले जातील. किंवा कोमॉर्बिडिटीबाबत निर्णय घेतला जाईल. पहिल्यांदा ३५ ते ४४ या वयोगटातील लोकांना प्राधान्य देण्याबाबत आरोग्य विभाग विचार करत आहे.

हेही वाचा: सलाम! आतापर्यंत एक कोटी लोकांना दिलं मोफत जेवण

४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ठरावीक केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे तरुण वर्गाची या ठिकाणी गर्दी होतानाचे चित्र दिसून आले आहे. मोठ्या शहरांतील तरुण ग्रामीण भागातील केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून स्लॉटबाबत चर्चा करणार आहे.

हेही वाचा: आपल्या शेजारील देशाचं राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहलंय; तुम्हाला माहितेय का?

आतापर्यंत राज्यभरातील १ कोटी ७३ लाख २१ हजार २९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. १८ ते ४४ वयोगटातील २ लाख १५ हजार २७४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. तर २८ लाख ६६ हजार ६३१ जणांना दोन्ही डोस देण्यात आले असून महाराष्ट्र देशात एक नंबरवर आहे. हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी ३८ पीएसए लँड कार्यान्वित करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून ९५ ते ९८ टक्के उपयुक्त ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे.

loading image
go to top