शिंदे-फडणवीसांचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’; सेनेचा हल्लाबोल| shivsena saamana attacks again on eknath shinde devendra fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena saamana attacks again on eknath shinde devendra fadnavis

शिंदे-फडणवीसांचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’; सेनेचा हल्लाबोल

बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे. शिंदे-फडणवीस यांच्या येण्याने महाराष्ट्राला सर्वकाही मिळेल. काहीच कमी पडू दिले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, ‘ईडी’च्या चौकश्या बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील. मराठी माणसाचे खच्चीकरण व महाराष्ट्राचा अवसानघात करतील, दुसरे काय होणार! अशा शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेने सामना अग्रलेखातून हल्लाबोल चढवला आहे. (maharashtra crisis shivsena saamana attacks again on eknath shinde devendra fadnavis )

हेही वाचा: देवेंद्रजी वेशांतर करून शिंदेंना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

काय म्हणले आहे?

मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना त्या सर्व प्रकारास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे, छगन भुजबळ वगैरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. असा आरोप सामनातून लावण्यात आला आहे.

सध्याचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’ आहे. त्यामुळे ही उधारी चुकवायची कशी? हाच प्रश्न आहे. शिवसेनेसाठी आपण कसा त्याग केला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. राणे व भुजबळांचेही तेच सांगणे होते. त्यागाच्या बदल्यात काय व किती मिळाले याचाही हिशेब द्यायला हवा. शिंदे यांचे एकवेळ मान्य करू, पण त्यांच्याबरोबर गेलेल्या किमान 25 आमदारांनी शिवसेनेसाठी कोठे रक्त सांडले, कोठे लाठ्या खाल्ल्या, घरावर कधी तुळशीपत्र ठेवले असा सवाल करत हे राज्याच्या जनतेला सांगितले तर बरे होईल. असा सल्ला शिवसेनेने बंडखोर आमदारांना दिला आहे.

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गिळत होती म्हणून बाहेर पडलो’’ या पालुपदास अर्थ नाही. भाजपबरोबर सत्तेत असताना वेगळे काय घडले होते? भाजपने प्रत्येक वेळी शिवसेनेचे पाय कापण्याचे व पंख छाटण्याचेच काम केले आणि त्याच विद्रोहाच्या ठिणगीतून महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये सुरुवातीलाच शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर त्यांचे मत आजच्यापेक्षा वेगळे असते.

हेही वाचा: उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत : संजय राऊत

शिंदे यांनी आज शिवसेना फोडून नवे राज्य आणले ते भाजपच्या मदतीने. ते त्यांनाच लखलाभ ठरो. शिंदे-फडणवीस यांच्या येण्याने महाराष्ट्राला सर्वकाही मिळेल. काहीच कमी पडू दिले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, जीएसटीचा परतावा देतील, आरेतील जंगलतोड करू देतील, ‘ईडी’च्या चौकश्या बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील. मराठी माणसाचे खच्चीकरण व महाराष्ट्राचा अवसानघात करतील, दुसरे काय होणार! असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

Web Title: Maharashtra Crisis Shivsena Saamana Attacks Again On Eknath Shinde Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top