उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत : संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut on mharashtra politics and rebel mla of shiv sena Uddhav Thackeray is not in trouble mumbai

उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत : संजय राऊत

मुंबई : ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पळून जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यासाठी तुम्ही काहीही कारण शोधली, पण आता मंत्र्याचे काम करा, ’’असे सुनावले. मुख्यमंत्री शिंदे गटात गेलेले आमदार गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता.४) विधानसभेत बोलताना संजय राऊत यांच्यावर खापर फोडले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘बंडखोर ज्या चार लोकांची नावे घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली.

ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचेच काम करत होते. आजही पक्षाचेच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत.’’

नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांनी हे कसे केले, त्यामागे कोणती महाशक्ती काम करत होती हे लोकांना माहिती आहे, असा टोला हाणत राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले.

Web Title: Sanjay Raut On Mharashtra Politics And Rebel Mla Of Shiv Sena Uddhav Thackeray Is Not In Trouble Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top