

Four Day Dry Day Announced In 29 Places Across Maharashtra
Esakal
Dry Day in Maharashtra: राज्यात महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणाऱ आहे. प्रचाराच्या तोफा १३ जानेवारीला थंडावणार आहेत. राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, प्रशासनाची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आता नागरिकांसाठी प्रशासनाने काही नियम जारी केले आहेत. मंगळवार १३ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत राज्यात जिथं महापालिका निवडणुका आहेत तिथं ड्राय डे लागू करण्यात आला आहे.