Maharashtra Din : महाराष्ट्रातील अद्भूत असं ठिकाण, म्हणतात परशुरामांनी याची निर्मिती केली, एकदा बघाच

आज आणि उद्या या दोन दिवसांच्या सुट्ट्यांत तुम्ही अशा एका ठिकाणाला भेट देऊन येऊ शकता जिथे तुम्हाला निसर्गाचा देवनिर्मित अद्भूत नमुना बघायला मिळेल.
Maharashtra Din
Maharashtra Dinesakal

Maharashtra Din : महाराष्ट्राला अनेक सुंदर ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. कालपासून सलग सोमवारपर्यंत सुट्ट्या असल्याने पर्यटकांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. आता लाँग विकेंडला जायचे कुठे असे विचार नक्कीच तुमच्या मनात घर करू लागले असतील. आज आणि उद्या या दोन दिवसांच्या सुट्ट्यांत तुम्ही अशा एका ठिकाणाला भेट देऊन येऊ शकता जिथे तुम्हाला निसर्गाचा देवनिर्मित अद्भूत नमुना बघायला मिळेल. हे ठिकाण कुठलं आणि या ठिकाणाची खासियत काय आहे ते आपण जाणून घेऊया.

सहस्रकुंड

या अद्भूत ठिकाणाचे नाव आहे 'सहस्रकुंड'. प्रसिद्ध आख्यायिकेनुसार मराठवाडा आणि विदर्भाच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर भगवान परशुरामांनी बाण मारून सहस्रकुंडांची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात इस्लापूर गावापासून उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पैनगंगा नदीला बाणगंगा म्हणूनही ओळखले जाते. उंचावरून कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने याची पर्यटनस्थळ म्हणून घोषणा केली आहे. सहस्रकुंड येथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली येतात. शिखर कैलास टेकडी येथे घनदाट जंगल आहे. (Amazing Tourist Place)

 पैनगंगा नदीच्या तीरावर पुरातनकालीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. या वेळी हजारो भाविक येथे स्नान करून महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगण राज्याच्या कोनाकोपऱ्यातून तीर्थक्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे भरपूर पाणी असते. (Maharashtra Din)

Maharashtra Din
Maharashtra Din : निसर्गसौंदर्याचा बडा नजराणा! हिरवा शालू नेसून सजलाय हा घाट, नक्की बघा

येथे राहाण्याचीसुद्धा सोय आहे. नांदेडपासून हे ठिकाण ७५ किमी दूर आहे. पर्यनटस्थ गावापासून दूर असल्याने येथे जेवणाची सोय नाही. नाश्त्याची सोय होते. येथे जाण्यासाठी नांदेडहून खासगी वाहनाने व महामंडळाच्या बसेसने जाता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com