Maharashtra Din : या धबधब्यात भिजला नाही तर आयुष्यात काय केलं? एकदा तरी भेट द्यावी असा 'आंबोली घाट'

महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने तुम्ही महाराष्ट्रातील अशाच एका डोंगरघाटातील निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायला हवी
Maharashtra Din
Maharashtra Dinesakal

Maharashtra Din : निसर्गाचा आनंज जवळून अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं. महाराष्ट्राला अनेक निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. काही लोकांना घाटातील पाऊस आणि चिंब भिजवणारा वारा जवळून अनुभवायला खूप आवडतो. तुम्हीही असे छंदप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतं. महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने तुम्ही महाराष्ट्रातील अशाच एका डोंगरघाटातील निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायला हवी. चला तर जाणून घेऊया या ठिकाणाबाबत.

आंबोली हे समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवरचे थंड हवेचे ठिकाण आहे. या गावाचा बराचसा भाग दाट जंगलाने व्यापलेला आहे. ब्रिटिश काळात बेळगाव ते वेंगुर्ले असा समुद्राला जोडणाऱ्या रस्त्याचा हा भाग होता. या रस्त्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांना विश्रांतीची व्यवस्था व्हावी, या हेतूने आंबोलीचा विकास केला गेला. ब्रिटिश अधिकारी वीकेंडला येथे विश्रांतीसाठी यायचे.

या ठिकाणाला भेट द्यायची उत्तम वेळ

डोंगरउतारामुळे तसेच खोल दरीमुळे पावसाळ्यात येथे फिरताना विशेष काळजी घ्यावी लागते. दुचाकीवरून पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना फार सावधगिरी बाळगावी लागते. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा. पावसाळ्यात स्थानिक कमिटीमार्फत मुख्य धबधब्याकडे जाण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. (Amboli Ghat)

पावसाळ्याच्या कालावधीत येथे प्रवाहित होणारे धबधबे वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद मिळवून देतात. थंडीच्या कालावधीतही येथे राहण्याचा आनंद अवर्णनीय असतो. पर्यटनासाठी विशेषतः जुलै ते सप्टेंबर हा कालावधी चांगला आहे. या कालावधीत वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येतो. पावसाळा आणि हिवाळ्यामध्येही हिरवाईने नटलेल्या घाटाचे सौंदर्य खूप सुंदर असते. (Maharashtra)

Maharashtra Din
Maharashtra Din 2023 : दुरूनच नेत्रसुख देणारे लोणार सरोवर 'या' कारणांनी आहे पर्यटकांचे विशेष आकर्षण

पर्यटकांसाठी विशेष सूचना

सावंतवाडी संस्थानची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनही आंबोलीची ओळख राहिली आहे. संस्थानकालीन राजवाड्याच्या खुणा येथे अजूनही पाहायला मिळतात. वर्षा विहारासाठी लाखो पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात. मुसळधार कोसळणारा पाऊस पाहायचा आणि अनुभवायचा असेल तसेच धबधब्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर आंबोलीसारखे दुसरे ठिकाण नाही. (Amazing Tourist Places)

महादेवगड पाॅईंट, मनसंतोषगड पाॅईंट, कावळेसाद पाॅईंट अशी ठिकाणे विशेष लक्षवेधून घेतात. जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्यांना आंबोलीने नेहमीच भुरळ घातली आहे. येथे साप, बेडूक, फुलपाखरे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती पाहावयास मिळतात. यामुळे देशभरातील पर्यटक, पर्यावरण अभ्यासक आंबोलीला भेट देतात. तेव्हा तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा तुम्हाला ओलंचिंब भिजवणारं निसर्गसौंदर्य बघायचं असेल तर या ठिकाणाला तुम्ही एकदातरी भेट द्यायलाच हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com