Maharashtra Din: महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीस म्हणाले, 9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे...

राज्यभरात आज ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे.
Maharashtra Din
Maharashtra Din

राज्यभरात आज ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुर येथे ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्यात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. (Maharashtra Din Devendra Fadnavis on Eknath Shinde Farmer Economy Trillion Economy )

काय म्हणाले फडणवीस?

9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि राज्याने विविध क्षेत्रात प्रगती केली. निसर्गाच्या लहरीपणा मुळं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. शेतकरी समृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारनं किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी विविध योजना सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.

Maharashtra Din
Maharashtra Din : पुण्यात शिवरायांचे संकल्पना उद्यान, राज्यभर शिवराज्य महोत्सव; राज्यपालांच्या घोषणा!

शेतकऱ्यांना आता विम्यासाठी पैसे भरण्याची गरज नाही. एक रुपयात विमा भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून शेती शाश्वत झाली पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

Maharashtra Din
Amol Kolhe Injured: अभिनेते अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत, 'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान अपघात..

एसटी बसच्या तिकीटामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आलीय. मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आणली. जलयुक्त शिवार 2 सूरु करण्यात येत आहे. यावर्षी १० लाख घरं बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शेतीसाठी आपण अनेक निर्णय घेतले. पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना घरं दिली अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्या आज उद्घाटन करण्यात येत आहे. नागपूरात देखील 14 दवाखाने सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हा प्रगतिशील राहिलाच आहे, मात्र अधिक प्रगती करायचा आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार कार्यरत राहील. महाराष्ट्र असाच प्रगती कडे जात राहो अशी प्रार्थना देखील फडणवीस यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com