

Maharashtra Drought Crop Panchnama
esakal
Drought Relief Maharashtra : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडे मदतीचे ज्ञापन तातडीने सादर करावयाचे असल्याने पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी २ ऑक्टोबर (सार्वजनिक सुट्टी) तसेच ३ व ४ ऑक्टोबर २०२६ (शासकीय सुट्ट्या) या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्याचे आदेश सदस्य सचिव जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती गजानन गुरव यांनी दिले आहेत.