

Maharashtra Drought Trigger
esakal
सोलापूर : पावसाअभावी राज्यातील १३७ लाख हेक्टरपैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. या पार्श्वभूमीवर पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड आणि सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे.
कृषी विभागाने हा अहवाल सरकारला सादर केला आहे. दुसरीकडे, दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी या तालुक्यांची यादी ‘एमएनसीएफसी’ला (महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र) दिली आहे.
दुष्काळाची पहिला ट्रिगर निश्चित करण्यासाठी पर्जन्यमानाचे विचलन, पावसातील खंड व जून-जुलैमधील सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी, जून ते सप्टेंबरमधील सरासरी पाऊस विचारात घेतला जातो. यानुसार २७ जिल्ह्यांमधील १३९ तालुक्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त आहे. पण, हलक्या जमिनीसाठी किमान २१ दिवसांचा आणि भारी जमिनीसाठी २८ दिवसांचा खंड विचारात घेतला जातो. जिल्हानिहाय जमिनीचे वर्गीकरण करून त्यानुसार हलकी व भारी जमिनीतील खंड विचारात घेऊन तालुक्यांची संख्या निश्चित करावी लागेल, असेही ‘कृषी’च्या अहवालात नमूद आहे.
सात जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि १७५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार राज्यातील १७५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होऊ शकतो, अशी सद्य:स्थिती आहे.
१. ठाणे विभाग : ठाण्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ. रायगडमधील पनवेल, कर्जत, पेण. पालघर जिल्ह्यातील वडाळा डहाणू, तलासरी, विक्रमगड.
२. पुणे विभाग : अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोला, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता. पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, राजगुरूनगर, शिरूर घोडनदी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर सासवड. सोलापुरातील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिस, मंगळवेढा.
३. नाशिक विभाग : नाशिकमधील इगतपुरी, मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, सिन्नर, येवला, देवळी. धुळ्यातील धुळे, शिक्री, शिरपूर, शिंदखेडा. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अकराणी. जळगावमधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, इदलाबाद, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, जामनेर, पाचोरा, भांडगाव, धरणगाव, बोधवाडा.
४. कोल्हापूर विभाग : साताऱ्यातील पाटण, खटाव वडूज, माण दहिवडी, फलटण, खंडाळा. सांगलीतील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ. कोल्हापूरमधील चांदगड, राधानगरी.
५. छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, शिल्लोड, सोयगाव. जालन्यातील अंबड, परतूर, बदनापूर, घनसांगवी, मंठा. बीडमधील अष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, शिरूर कासार.
६. लातूर विभाग : लातूरमधील रेनापूर, धाराशिवमधील धाराशिव, तुळजापूर, परांडा, भूम. परभणीतील पाथरी, मानवत.
७. अमरावती विभाग : बुलढाण्यातील जळगाव जामोद, बुलढाणा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा. अकोल्यातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी. वाशिममधील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा. अमरावतीतील भातकुली, दर्यापूर. यवतमाळमधील दारवा.
८. नागपूर विभाग : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी. गोंदियातील तिरोडा, सेकसी. गडचिरोलीतील कुरखेडा, धानोरा व इटापल्ली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.