
Mahavitaran Power Tariff Increase Sparks Public Outrage
Esakal
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर महावितरणकडून वीजदरवाढीची घोषणा करण्यात आलीय. यामुळे ऐन सणासुदीत वीज ग्राहकांना महावितरणने शॉक दिलाय. आता वीजबिलात इंधन समायोजन शुल्क लादण्यात आलं आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनित ३५ ते ९५ पैसे इतकी वाढ होणार आहे. दिवाळीच्या तोंडावरच महावितरणने घेतलेल्या या निर्णयामुळे वीज ग्राहकांना वाढीव बिल भरण्याची वेळ येणार आहे.