

Air Pollution
ESakal
मुंबई : राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. वातावरण फाउंडेशन आणि एन्वारोकॅटलिस्ट यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या अहवालात राज्यातील निम्म्याहून अधिक शहरांमध्ये सूक्ष्म धूलिकण राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अधिक असून सर्वच शहरांमध्ये पीएम १० पातळी ठरावीक मानकांपेक्षा अधिक आहे.